लोकसत्ता टीम

नागपूर : मान्सूनचे आगमन झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातील छिद्रातून पीओपीचे तुकडे खाली पडले. सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही.

छताच्या मेंटनन्सचे काम सुरू असताना ही घटना घडल्याचे विमानतळाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शहरात गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम राहिला. या पावासाचा फटका विमानतळालाही बसला. आगमन क्षेत्रातील छताला लागलेल्या पीओपीचे तुकडे खाली पडू लागले. यावेळी फ्लाइट ६ ई-७४२७ इंदूर- नागपूरचे प्रवासी बाहेर निघत होते. अचानक पीओपीचे तुकडे पडल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.