गोंदिया : तिरोडा- गोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या प्रचार गाडीवर विरोधकांनी केलेल्या तोडफोडीची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पाहून असे स्पष्ट होते की त्यांचे विरोधक आताची आपली परिस्थिती पाहून हतबल झाले असून, निवडणुकीच्या लढाईत त्यांची ताकद कमी पडत असल्याचे दिसून येत असल्याचे बोपचे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे उमेदवार रविकांत (गुड्डू) बोपचे हे तिरोडा-गोरेगावातील जनतेमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून त्यांच्या सुरळीत प्रचाराला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे त्यांच्या विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या प्रचाराच्या गाडीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याने विरोधकांच्या हतबलताचे स्पष्ट पुरावा या घटनेमुळे मिळतो. या घटनेमुळे आतापर्यंत सौम्य पद्धतीने सुरू असलेल्या या निवडणुकीत अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा…गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका, आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा

या घटनेच्या वेळी उमेदवार रविकांत(गुड्डू) बोपचे आणि त्यांच्या समर्थकांनी संयमाने आपली प्रतिक्रिया दिली. प्रसंगी उमेदवार रविकांत बोपचे म्हणाले, ही तोडफोड विरोधकांच्या पराभवाची सुरुवात दर्शविते. तसेच तिरोडा गोरेगावातील जनतेचा विश्वास माझ्या सोबत आहे, आणि मी जनतेच्या आशीर्वादानेच पुढे जाणार आहे. अश्या कोणत्याही प्रकारच्या भ्याड हल्ल्याला मी भीख घालत नाही, आणि अश्या तोडफोडीचे मी घाबरणार सुद्धा नाही.

गोरेगावातील जनतेनेही या प्रकारच्या घटनेची निंदा केली असून, महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हेही वाचा…गडकरींकडून महाराष्ट्र पालथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाल आपलाच उधळणार !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या मविआच्या प्रचारात आलेला जोर आणि जनतेचा ठाम पाठिंबा पाहता, विरोधकांची हताशा अधिक स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा रविकांत बोपचेंच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द कायम असून,त्यांनी गुलाल आपलाच उधळणार, असे घोषवाक्य त्यांनी आपल्या पुढील प्रचारात उचलून धरले आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभे महायुतीचे उमेदवार भाजपचे विजय रहांगडाले विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे उमेदवार रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्यातील थेट ही निवडणूक आता अधिक चुरशीची होत आहे. त्यामुळे पुढील २० तारीख रोजी होणारा मतदान आणि त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.