scorecardresearch

Premium

शासन आपल्या दारी नुसता फार्स; वृद्ध महिलेची दाखल्यासाठी पायपीट

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कुणासाठी? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.

shasan aplya dari, washim old woman, old woman didnt get her documents
शासन आपल्या दारी नुसता फार्स; वृद्ध महिलेची दाखल्यासाठी पायपीट (संग्रहित छायाचित्र)

वाशीम : एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांना शासकीय कामासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे एका साध्या दाखल्यासाठी दोन आठवडेभरापासून ६० वर्षीयवृद्ध महिला तहसील कार्यालयाचे उंबरठे झीझवीत आहे.

हेही वाचा : उमरखेड : बसजळीत प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद

Yoga for Back Paine
पाठदुखीची समस्या सोडत नाही पाठ? ‘या’ एका आसनाने मिळेल फायदा
man kidnapped for marriage hyderabad
फोटो पाहून प्रेम, लग्नासाठी व्यावसायिक महिलेनं केलं मुलाचं अपहरण; गुन्हा दाखल
Pet dog bites young man crime against woman
पिंपरी : पाळीव श्वानाचा तरुणाला चावा, महिलेविरोधात गुन्हा
Postpartum diet New mothers keep these nutritional points in mind after giving birth
बाळाला दूध पुरत नाही, पोट भरत नाही; पहिल्यांदा आई झालेल्या स्तनदा मातांनी स्वत:सह बाळाची कशी काळजी घ्यावी?

रिसोड तालुक्यातील वाकद येथील ६० वर्षीय वृद्ध शांताबाई अंभोरे यांना तलाठ्याकडून एक दाखला घायचा आहे. मात्र, तलाठी गावातच येत नसल्याने सदर महिला गेली दोन आठवड्यापासून रिसोड तहसीलच्या चकरा मारत आहे. ती वृद्ध महिला तहसील कार्यालयात येण्यापूर्वी घरूनच भाकरीच गठुड बांधून आली होती. मात्र या ठिकाणी तलाठी भेटलाच नाही किंवा कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मदत मिळाली नसल्याने हताश होऊन घरी गेली. अशा अनेक घटना जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयात दिसून येतात. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कुणासाठी? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In washim old woman did not get her documents from talathi as talathi absent in his office risod taluka pbk 85 css

First published on: 26-11-2023 at 15:58 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×