वाशिम : मृत्यू कोणाला कुठे गाठेल, याचा काही नेम नाही. भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या. मात्र, ट्रकचे टायर निखळून ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे.

धावत्या ट्रकचे टायर निखळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तींच्या अंगावर धडकल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील अंधार सावंगी फाट्यावर घडली. शेख मनसार शेख रोशन हे लग्नाला जाण्यासाठी मेडशी येथील अंधार सावंगी बस स्थानकावर गाडीची वाट पाहत उभे होते. दरम्यान, धावत्या ट्रकची दोन चाकं अचानक निखलून त्यांच्या अंगावर धडकली. यामुळे ते खाली कोसळले. त्यांना मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत जुम्मा छोटू गारवे हे जखमी झाले असून एका कारचेसुद्धा नुकसान झाले आहे.

हेही वाचा…“राहुल गांधींवर कारवाई करणार,” हंसराज अहीर यांची माहिती; म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी ओबीसी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर. जे. ५० जी. ए. २०११ क्रमांकाचा १४ चाकी ट्रक मालेगाववरून अकोल्याकडे जात होता. अंधार सावंगी फाट्यावर या धावत्या ट्रकचे दोन टायर अचानक निखळले. ही चाके रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शेख मनसार शेख रोशन यांना जाऊन धडकलीत. यात त्यांचा मृत्यू झाला. चालकाला याची काडीमात्र कल्पना नव्हती. रस्त्याच्या आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी ट्रक थांबवून चालकाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. मृताचे नातेवाईक शेख जावेद शेख मंसार यांनी मेडशी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.