यवतमाळ : घरकुलाकरिता असलेला हप्ता मिळत नसल्याने एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमध्ये घडली. गटविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून युवकाची समजूत काढल्याने अनर्थ टळला.

संतोष उकंडराव बुटले (रा.माळेगाव, ता. आर्णी) याचे वडील उकंडराव विश्वनाथ बुटले यांना घरकुल योजनेतून घर मिळाले. त्यासाठी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता बुटले यांना मिळाला. मात्र, दुसरा हप्ता देण्यास पंचायत समितीमधील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बुटले यांनी केला आहे.

cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
petrol balloons nashik marathi news
नाशिक: पेट्रोल फुगे फेकून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
railway employees
Railway Employees Arrested : धक्कादायक! वरिष्ठांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक फेल करण्याचा प्रयत्न; तिघांना अटक
Dombivli, attempt to kill youth in Dombivli,
डोंबिवलीत तरुणाच्या अंगावर मोटार घालून फरफटत नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न
Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण
crime against women
Rape Attempt on Nurse: बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने वार; नर्सच्या धाडसामुळं अनर्थ टळला, आरोपींना अटक
Agitation of farmers affected by canal leakage to stop circulation of Nilwande Dam
निळवंडे धरणाचे आवर्तन बंद पाडण्यासाठी कालव्याच्या गळतीमुळे त्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन

हेही वाचा : बुलढाण्यावर पाणी टंचाईचे सावट! येळगाव धरणात १५ टक्के जलसाठा

वडील वयोवृद्ध असल्याने त्यांना ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे दुसरा हप्ता मिळावा म्हणून संतोष याने पाठपुरावा केला. मात्र, त्यात अपयश आले. वारंवार विनंती करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत त्याने आज टोकाचे पाऊल उचलले. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातच त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतः ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गटविकास अधिकारी आर.आर.खरोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, घरकुलच्या हप्ता खात्यात जमा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप बुटले याने केला आहे. घरकुलाचे पैसे मिळावे म्हणून अनेक लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : जोगन्नाचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या जिव्हारी; ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन

जिल्ह्यात मोठया प्रमाणात घरकुल मंजूर झाले आहेत. अनेकांची पावसाळ्यापूर्वी घर बांधण्याची लगबग सुरू आहे. मात्र अभियंते, अधिकारी पैसे घेतल्याशिवाय निधी बँकेत जमा करत नसल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेतील काय, असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.