यवतमाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागात कायम करण्याच्या मागणीसह १०० टक्के मानधन वाढीसाठी गेल्या १८ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी शनिवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या टिळकवाडीतील निवासस्थानासमोर पीपीई किट परिधान करून स्वछता मोहीम राबवत काळी दिवाळी साजरी केली. मात्र पालकमंत्र्यांनी या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधिंसह पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली.

हेही वाचा : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना अनुभवावर गुण, पण लाभ शून्य! सरळसेवा भरतीत नोकरी मिळणार कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचा निषेध नोंदवित आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. कोविड योद्धा म्हणून कौतुक होऊनही अभियानातील आरोग्य कर्मचारी कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून आंदोलनाकडे सामान्यांचे लक्ष वेधले. आंदोलनात डॉक्टर, परिचारिका वऔषध निर्माण अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, क्षयरोग तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आशा समूह संघटक सहभागी झाले होते. यावेळी संतोष राठोड, सुधीर उजवने, मंगेश वड्डेवार, पंकज गुल्हाने, प्रवीण मेंढे, बिपिन चौधरी, सचिन अजमिरे, रुपाली हांडे, धम्मदीप गायकवाड आदी सहभागी झाले होते.