यवतमाळ : परजिल्ह्यात दुचाकीची चोरी करून यवतमाळ जिल्ह्यात आपल्या परिचयातील व्यक्तींना वाहने विक्री करणाऱ्या चोरट्याना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई लाडखेड पोलिसांनी केली. लखन देवीदास राठोड (२६) रा. मोरगव्हाण ह.मु. सुलतानपूर, जि. बुलडाणा, वैभव घुले (२०)रा. सुलतानपूर, बादल राठोड (२३), शुभम राठोड (२६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

हेही वाचा : काँग्रेसला सुगीचे दिवस…पण, दावेदारांसोबतच डोकेदुखीही वाढली…वर्धेत तर एका नेत्याने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवळगाव येथून ४ जुलै रोजी दुचाकी क्र. एमएच-३२-आर-११२६ चोरी गेली होती. या प्रकरणी लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी टॉवर लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण केले. अट्टल चोरटा लखन राठोड हा याच पारिसरातील मोरगव्हाण येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास अटक करून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. वैभव घुले याच्या मदतीने वाहन चोरी केल्याची कबुली त्याने दिली. लखन हा पराजिल्ह्यातून दुचाकी चोरी करून आणायचा व यवतमाळ जिल्ह्यातील संपर्कात असणाऱ्यांना विक्री करायचा. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बुलडाणा, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी येथून वाहने चोरी केली. परजिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. ही कारवाई लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर, नितीन सलाम, उमेश शर्मा, विठ्वल कोपनर, जयंत शेंडे, प्रवीण कोहचाडे, अनिल सांगळे, प्रेम राठोड आदींनी केली.