नागपूर-मुंबई या बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचे उद्घाटन येत्या जानेवारी महिन्यात होणार, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री व या प्रकल्पाचे प्रणेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उमरेड येथील कार्यक्रमादरम्यान बोलताना केले.

हेही वाचा- परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती व तो २०१९ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प रस्ते विकास महामंडळाने केला होता. २०१९ नंतर दोन वर्ष करोनाचा फटका या महामार्गाच्या कामाला बसला. त्यानंतर महामार्गावरील पूल कोसळल्याने व अन्य कारणामुळे उद्घाटनाच्या तारखा निश्चित होऊनही ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा नागपुरात केली होती. पण तारीख जाहीर केली नव्हती.

हेही वाचा- नागपूर:इतर मागासवर्गीय उपेक्षित!; राजकीय दबाब निर्माण करण्याची आवश्यकता

नागरिकांसाठी लवकरच मार्ग खुला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते. एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच होईल, असे सांगितले. पण फडणवीस यांनी उमरेड येथील रस्ते चौपदरीकरण लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना समृद्धी महामार्गाचे उद्घाटन जानेवारीत होणार असल्याचे सूतोवाच केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एकाच दिवशी महामार्गाच्या उद्घाटनाबाबत सकारात्मक संकेत दिल्याने नव्या वर्षात हा मार्ग लोकांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.