नागपूर : पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरत असताना ‘मोबाईल फोनवर बोलू नका’ अशी नोटीस लिहिलेली असते. ही गोष्ट पेट्रोल पंप कर्मचारीही अनेकदा ग्राहकांना सांगतात. मात्र बरेचजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. पंपावर मोबाईलच्या वापराबाबत अलर्ट करणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – वाशीम: वैभव सोनुनेला तब्बल दीड कोटींची शिष्यवृत्ती; परदेशी विद्यापीठांची ऑफर, लवकरच शिक्षणासाठी ब्रिटनला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरत असताना एका दुचाकीला अचानक आग लागल्याचे दिसून येते. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नागपूर जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. व्हिडीओमध्ये दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला उभी राहिली व उपस्थित कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर फायर सेफ्टी कॉल सुरू करून आग आटोक्यात आणल्याचे दिसते.