वर्धा : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पक्षात हार्ड टास्क मास्टर म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक कामाचे सूक्ष्म नियोजन तसेच सांगितलेल्या कामाची नीट अंमलबजावणी त्यांना अपेक्षित असल्याचे पदाधिकारी सांगतात. आताही तसेच झाले.

अकोला येथील बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्यात त्यांची एक सूचना महत्वाची होती. पक्षाचे स्वतंत्र निवडणूक कार्यालय असलेच पाहिजे. ते खासदार, आमदार किंवा संभाव्य उमेदवाराच्या घरी किंवा त्याच्या कार्यालयात नसावे. कारण काय ? तर विशिष्ट व्यक्तीच्या मालकीच्या ताब्यातील कार्यालयात जाण्यास काही पदाधिकारी संकोच करू शकतात. नेता म्हटलं की त्याचे विरोधक आलेच. त्याचा गट असतोच. त्यामुळे पक्षाला मानणारे पण त्यास पसंत न करणारे निवडणुकीच्या काळात त्याच्या कार्यालयात जातीलच, असे नाही. ही आज्ञा शिरसावंज्ञ मानत जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी कार्यालयाचा शोध घेतला.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यालयाचे पण काही निकष ठेवण्यात आले होते. ते शहराच्या मध्यवर्ती भागात, प्रशस्त, निवास सुविधायुक्त असे असले पाहिजे. वाहनचालक तसेच बाहेरून येणारे पाहुणे थांबू शकले पाहिजे. त्याची जाण ठेवून लोकसभा निवडणूक प्रभारी सुमित वानखेडे व गफाट यांनी बॅचलर रोडवरील शीतल मंगल कार्यालयावर शिक्कामोर्तब केले. त्याचे विधिवत उद्घाटन झाले. आता कार्यकर्त्यांचा राबता सूरू झाला आहे. या ठिकाणी कोणाचे फोटो असावे हे पण ठरल्यानुसार लागले आहेत. या सर्व बाबी शहा यांना कळविण्यात आल्या आहेत.