लोकसत्ता टीम

नागपूर: ‘इंडिया’च्या नावाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असेल तरी ही आघाडी बारुंद नसलेला बॉम्ब असून ही केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते मुंबईत हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील. त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, ना मुद्दे, फक्त नरेंद्र मोदी विरोधात मोट बांधण्याचा देखावा करण्यासाठी ते एकत्र येत आहे,अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली.

‘इंडिया’ च्या बैठकीला मुंबईला आलेल्या अनेक नेत्यांकडे गठ्ठा मतदान नाही. यातील अनेक पक्षांची महाराष्ट्रात किती मते आहेत ते समोर आणले पाहिजे. आम्ही जिथे जातो तिथे लोक मोदींच्या नावाने येतात. आगामी निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मत मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-गोंदिया : रानडुक्कराच्या हल्ल्यात तीन गावकरी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकर यांना बोलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांचा आहे, पण आंबेडकर यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पटली नाही.काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय विरोधी, आंबेडकर विरोधी राहिली आहे त्यामुळे आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेतले नसेल, असे बावनकुळे म्हणाले.बारामतीमध्ये महायुतीच जिंकणार, आहे तिन्ही नेते( शिंदे, फडणवीस पवार) हे महाविकास आघाडीचा करेकट कार्यक्रम करणार, असा दावा त्यांनी केला.