स्वाईन फ्लू एन्फ्लूएन्झातील जनुकीय बदलातून एच- ३ एन- २ हा नवीन विषाणू तयार झाला. करोनानंतर नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने एन्फ्लूएन्झा विषाणूचा उद्रेक वाढला, अशी माहिती सुप्रसिद्ध पल्मनाॅलाॅजिस्ट आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स-दिल्ली) माजी संचालक पद्मश्री डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

हेही वाचा >>>वाशीम : अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात १२ मार्चला आयोजित ॲकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ‘ॲम्सकॉन २०२३’ परिषदेच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, घाबरण्याचे कारण नाही. एच-३ एन-२ चा उद्रेक झाला तरी तो सौम्य असेल आणि तोही पावसाळ्यानंतरच होऊ शकतो. सध्या उन्हाळा असल्याने फारसा धोका नाही. मात्र रोग प्रतिकारशक्ती कमी असलेले ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, हृदयरोगी, श्वसनसंस्था विकारग्रस्तांना धोका आहे. त्यामुळे करोना नियमांचेच काटेकोर पालन करावे. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांसह तांत्रिक मनुष्यबळ (पॅरामेडिकल) आरोग्याच्या पाठीचा कणा आहे. रुग्णसेवेत डॉक्टरांपेक्षा जास्त संवेदशीलतेने तसेच जबाबदारीने ते काम करतात. अशावेळी ग्रामीण भागातील डॉक्टरांचा तुटवडा लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टेलिमेडिसीनचा आधार देत वैद्यकीय सेवेसाठी परिचारिकांना (नर्सिंग प्रॅक्टिस) संधी देणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. गुलेरिया यांनी दिला.