नागपूर : निवडणूक प्रक्रियेत सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अभिनव उपक्रम राबवले जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीतील काही मतदान केंद्रांची रचना वेगवेगळ्या विषयांवर आधारित करण्यात आली आहे. यातील बहूतांश केंद्र ही जंगल आणि पर्यावरणाची निगडीत विषयांवर सजवण्यात आली आहेत.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सरकारकडून आवाहन केले जात आहे. मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी यावर्षी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील कट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची संकल्पना बांबूवर आधारित आहे.
हेही वाचा…आयोगाचे ओळखपत्र, पण यादीतून नाव गहाळ, मतदारांमध्ये संताप “एमटी” मालिकेतील नावे गाळली
नागपुरातील दक्षिण-पश्चिममधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या मानववंशशास्त्र विभागातील कक्ष क्र. आठमध्ये जंगलाचे दर्शन घडते. पश्चिम नागपुरातील सरस्वती विद्यालयातील कक्ष क्र. ३१६ कापड उद्योगर, रामटेक तालुक्यातील पारशिवनीजवळील कुंवारा भिवसेन येथील केंद्र आदिवासींशी प्रेरित होऊन इको फ्रेंडली, पश्चिम नागपुरातील दादा रामचंद्र बाखरु सिंधू महाविद्यालयातील कक्ष क्र. १ इंद्रधनुश, उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळोतील कक्ष क्र. २६६ हा शेतीवर आधारित, पश्चिम नागपुरातील गोकूल बालवाडी येथील कक्ष क्र. १६२ पर्यावरणावर आधारित तर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्थानकाजवळील हडस हायस्कूलमधील केंद्र मेट्रोवर आधारित आहेत.
हेही वाचा…नागपुरात दडपशाही? भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे मतदार याद्यांमधून नावे गहाळ, मतदार म्हणतात…
एवढेच नाही तर अनेक केंद्रांवर सेल्फी पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत तेसुद्धा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि सेल्फी पॉईंट्स तिथल्या आदिवासी संस्कृतीची झलक दाखवत आहेत. अनेक मतदान केंद्रांची रचना ही संपूर्णपणे बांबूवर आधारित आहे. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून मतदान केंद्राची ही रचना करण्यात आली आहे.