अकोला : पश्चिम विदर्भात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या कापसाच्या भावात अस्थिरता असून दर कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कापूस विकावा की साठवून ठेवावा, या संम्रमात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाची मोठी उलाढाल होत असून आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील कापूस विक्रीसाठी येतो. कापसाला आठ ते साडेआठ हजार प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे.

पश्चिम विदर्भात पूर्वी सर्वाधिक क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जात होते. कालांतराने निम्म्याहून अधिक शेतकरी सोयाबीनकडे वळला. तरीही पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या पसंतीचे दुसऱ्या क्रमांकाचे पीक हे कापूसच आहे. कापसाच्या उत्पादनात पश्चिम विदर्भ आघाडीवर आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला होता. कापसाच्या प्रतिक्विंटल दराने ११ हजारांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम गाठला होता. कापसाला मिळालेला वाढलेला दर लक्षात घेऊन बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस पेरणीला प्राधान्य दिले. वरुणराजाने देखील बळीराजाला साथ दिली. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कापसाचे पीक बहरले. कापसाच्या उत्पादनात वाढ झाली. शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला आहे. कापसाने अद्याप अपेक्षित असा दर गाठलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात चढ उतार बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला. अनेक शेतकऱ्यांना अद्याप कापूस विक्रीसाठी आणला नाही.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

आणखी वाचा- नाशिक : न जमिनींसाठी माकपचा नाशिक-मुंबई मोर्चा काढण्याचा इशारा

कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे. सध्या याठिकाणी कापसाला आठ ते आठ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात कापसाचा दर थोडा जास्त होता. मात्र, त्यानंतर भावात घसरण झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात दरवाढ झाली. अकोला बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार ८०० ते आठ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून पेरणी करतात. त्यासाठी त्यांना पीक कर्जाचा आधार मिळतो. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही, ते सावकरी कर्ज काढून पेरणी करतात. उत्पादित माल विक्री करून मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत कर्ज फेडणे अपेक्षित असते. कर्ज वसुलीसाठी बँकसह खासगी सावकाराकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. त्यामुळे मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येतो. भाव पाडून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा देखील फायदा घेतला जातो. भाव पडल्याने शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागतो. आगामी काळात कापसाला विक्रमी दर मिळण्याच्या आशेवर मोठ्या शेतकऱ्यांचा कापसाची साठवणूक करून ठेवण्याकडे कल आहे.

आणखी वाचा- वॉट्सॲपवर ओळखी, सांगलीचा आरोपी, कोल्हापुरात बलात्कार अन् वर्धेत गुन्हा दाखल

तुरीने ‘भाव’खाल्ला

जिल्ह्यातील तुरीच्या उत्पादनाला बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळत आहे. अकोला बाजार समितीमध्ये तुरीला पाच ते आठ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान भाव मिळत आहे. सरासरी सहा हजार रुपये दर आहे. अकोट कृषी बाजार समितीमध्ये सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत भाव आहेत. तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.