नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर युवकाने मैत्रिणीला फिरायच्या बहाण्याने लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. नंतर ‘वयाने मोठी आहेस’ असे कारण सांगून लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी साहिल उमेश भलावी (२१) रा. भारकस, बुटीबोरी याला अटक केली आहे.

हेही वाचा >>> गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्याची चौकशी सुरू; पुणे, मुंबईचे पथक दाखल  

पीडित २३ वर्षीय तरुणी शुभांगी (काल्पनिक नाव) हिचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिला नेहमी इंस्टाग्रामववर चित्रफिती (रिल्स) बनवायची सवय आहे. तिच्या रिल्सला साहिल भलावी हा नेहमी ‘लाईक्स’ करीत होता. इंस्टाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेऊन संवाद सुरु केला. साहिल हा पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. ऑगस्ट २०२२ या दरम्यान साहिल शुभांगीला बुटीबोरी येथील फिरायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. बुटीबोरीतील एका लॉजमध्ये घेऊन गेला. त्याने लग्नाचे आमिष दा‌खवून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. गेल्या महिन्यात शुभांगीने त्याच्यावर लग्नासाठी बोलणी करायला घरी बोलावले. त्याने ‘माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस’ असे सांगून लग्नास स्पष्ट नकार दिला. प्रेमात दगा मिळाल्यामुळे शुभांगीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून साहिलला अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.