अकोला : पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

संपूर्ण जगात महागडी वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा एकंदर १६ देशांनी एकत्रित केलेला प्रकल्प असून त्याचा आकार फूटबॉलच्या मैदानापेक्षा मोठा असतो. सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर हे स्थानक एका दिवसात पृथ्वीच्या पंधरा प्रदक्षिणा पूर्ण करते. ते आपल्या भागातून जाते, त्यावेळी काही वेळापुरते ते चमकत्या फिरत्या चांदणी सारखे पाहता येईल.

हेही वाचा – नागपूर : मंत्री म्हणाले ३ तारखेला, प्रशासन म्हणते ५ ला, पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

हेही वाचा – चुकीला माफी नाही! एक चूक पडणार कोटी रुपयांची; नेमका काय आहे प्रकार? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४ ऑक्टोबरला रात्रीच्या प्रारंभी ७.०३ वाजता क्षितिजापासून १४ अंशावर उत्तर ते पूर्व दिशेला दीड मिनिटे, ५ ला. रात्री ७.५० वाजता, २८ अंशावर वायव्य ते उत्तर बाजूस पावणे दोन मिनिटे, ६ रोजी रात्री ७.०२ पासून साडेचार मिनिटांपर्यत ५४ अंशावर वायव्य ते आग्नेय दिशेला अतिशय चांगल्या स्वरुपात पाहता येणार आहे. ७ रोजी रात्री ७.५२ वाजता पश्चिम ते नैॠत्य बाजूला क्षितिजाजवळ पावणेतीन मिनिटे १३ अंशावर आणि ८ ऑक्टोबरला रात्री ७.०३ वाजता पश्चिमेकडून दक्षिणेकडील आकाशात २८ अंशावर पावणेसहा मिनिटे बघता येईल. हा अनोखा आकाश नजारा सर्वांनी अवश्य बघावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.