लोकसत्ता टीम

अकोला : खारपणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत आणि संरक्षणात्मक सिंचनासाठी सात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या २९ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. या बंधाऱ्यांद्वारे सुमारे ५१५ एकरांवर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आ.रणधीर सावरकर यांनी दिली.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

खारपणपट्ट्यात जमीन व पाणी खारयुक्त असल्याने शेतीवर दुष्परिणाम होतात. या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामध्ये अंबिकापूर बंधाऱ्यासाठी ४.५४ कोटी, लाखोंडा बु. बंधारा १.९६ कोटी, खरप बु. बंधारा ४.६४ कोटी, आपातापा बंधारा ४.५४ कोटी, दिनोडा ४.९४ कोटी, लाखोंडा बंधारा ४.९० कोटी आणि खडका येथील बंधाऱ्यासाठी ३.१३ कोटी असे एकूण सात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी सुमारे २९ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. या बंधाऱ्याच्या मदतीने सुमारे ५१५ एकर शेतीला सिंचन सुविधा निर्माण होईल.

आणखी वाचा-पावणे दोनशे कोटींची थकबाकी, देशमुख सहकारी साखर कारखान्याचा अखेर लिलाव

सध्या वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणामासह नैसर्गिक स्त्रोतांवर पाणी वापराचा ताण वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन करता यावे, यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यासारखी लहान जल संवर्धनाची कामे करण्यावर भर दिला जात आहे. सिंचनासाठी जमिनीवर लहान जलसाठे निर्माण करणे आवश्यक आहे. खारपाणपट्ट्यातील क्षेत्रामध्ये पाण्याच्या उपलब्धतेच्या अभावी बहुतेक शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेऊ शकत नाहीत. शेतीचा वापर चारच महिने होत असल्याने आठ महिने शेती वापराखाली नसते. हे टाळण्यासाठी जलसंधारण कामांच्या माध्यमातून सिंचन कामाचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे, असे आमदार सावरकरांनी सांगितले.