समलैंगिक असणे नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावे असे वाटते याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिकतेकडे कल असणे ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुरभी मित्रा यांनी केले.

हेही वाचा- पंतप्रधानांनी मने जिंकली! नागपूरमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

दीक्षाभूमीजवळील वांकर सभागृहात घेण्यात आलेल्या ‘रुबरू’ कार्यक्रमात डॉ. मित्रा यांनी समलैगिकतेबाबत शास्त्रीय माहितीसह सामाजिक व मानसिक दृष्टिकोन यावर माहिती दिली. डॉ. मित्रा म्हणाल्या, समलैंगिकता हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसे पुरुषाला स्त्रीचे आकर्षण वाटणे, स्त्रीला पुरुषाचे आकर्षण वाटणे, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणे हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला – स्त्रीचे, पुरुषाला – पुरुषाचे आकर्षण वाटू शकते. मात्र, भारतीय समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- बुलढाणा: एकीकडे ‘समृद्धी’चे लोकार्पण तर दुसरीकडे शेतकरी बेमुदत उपोषणावर, उपोषणस्थळी पोलिसांचा गराडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी स्वत:च्या आयुष्यात आलेला अनुभव सांगताना डॉ. मित्रा म्हणाल्या, मला लहानपणापासून कधी या गोष्टीचा विरोध झाला नाही. माझ्या मित्र, नातेवाईक यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी कधीच विरोध केला नाही. मी माझ्या वडिलांना वयाच्या १९ व्या वर्षी याबद्दल सांगितले होते. त्यावेळी बाबा माझ्यावर काही चिडले नाही, रागावले नाही. त्यांनी मला समजून घेतले. एक दोन वर्षात हे निघून जाईल, मैत्रिणींमध्ये असे होत असते, असे सांगितले. पण नंतर दोन वर्षे माझ्यात असे काही बदल झाले नाहीत. मला नाही वाटत की मी पुरुषासोबत लग्न करून राहू शकते. हे मी वडिलांना सांगितले. ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनीही समजून घेतले. त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली आणि हे नैसर्गिक आहे, असे सांगून त्यांनी स्वीकारले, असे सुरभीने सांगितले.