लोकसत्ता टीम

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील मंत्रिमंडळ खातेवतपाबाबत मोठी भविष्यावणी केली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन हिवाळी अधिवेशनाची शेवटची घटका आलेली आहे, असे असतानाही एकाही मंत्र्याला खाते वाटप झालेले नाही. या खातेवतपाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महत्वाचे विधान केले.

आणखी वाचा-नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटील म्हणाले, ‘बीड जिल्ह्यातील केजमधील झालेली घटना अतिशय गंभीर आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. सामान्य माणसाचा बळी जात आहे. राजकारणात असणारी लोकं खून करत असतील तर त्याचे प्रायश्चित्त कुणाला तरी घ्यावे लागेल. मुख्य म्हणजे पोलिस प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. बीडमध्ये अक्षरश: गुंडाराज सुरू आहे.’ ‘गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत. ते आणि इतर सदस्य मिळून सर्व आमदार सभागृहात विषय मांडत आहे. यंदा सरकारकडून खातेवताप होणार नसल्याचेही जयंत पाटील म्हणाले.