लोकसत्ता टीम

नागपूर: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. केंद्रीय अन्वेषण विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://cbi.gov.in/ या संकेतस्थळावर आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ४ मे २०२४ अगोदर अर्जही करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया पैरवी अधिकारी पदासाठी होत आहे. एकूण चार जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

आणखी वाचा-बुलढाणा: मतदानासाठी लगबग… तब्बल साडेचार कोटींची रक्कम… यंत्रणांची धावपळ, मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागेल. येथे आपल्याला भरती प्रक्रियेची जाहिरात देखील वाचायला मिळेल. उमेदवाराने व्यवस्थित जाहिरात वाचूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सीबीआय सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, १० वा मजला, प्लॉट क्रमांक सी ३५ ए, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे अर्ज करावा. ४ मे २०२४ च्या अगोदरच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. आपल्याला अर्जासोबतच काही कागदपत्रेही द्यावी लागणार आहेत. अपूर्ण कागदपत्रे असतील तर उमेदवाराला ग्राह्य धरले जाणार नाही.