बुलढाणा: पैशांच्या वादावरून मोताळा येथील एका इसमाचे अपहरण करण्यात आले. चौघांनी जीवे मारण्याच्या उद्धेशाने चारचाकी वाहनात कोंबून नेले.यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा थरारक घटनाक्रम घडला असून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शेख आरिफ शेख सत्तार( ३०, राहणार बोराखेडी, ता मोताळा, जिल्हा बुलढाणा) असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
हेही वाचा… चंद्रपूर : हेल्मेट न घातल्याने आठ महिन्यात १२९ दुचाकीस्वारांनी गमावला जीव
गुरुवारी (दि ६) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोताळा मलकापूर मार्गावरील साईराम हॉटेल (ढाबा) जवळ त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कारमध्ये नेण्यात आले. सुदैवाने आरिफचा मित्र राजू गोकुळ खरात( रा भिलवाडा, बोराखेडी) याला चोघे जण त्याला भेटल्याची माहिती होती. त्याने बोराखेडी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.
हेही वाचा… हिमसागर एक्सप्रेस प्रवाशांची की दारु विक्रेत्यांची? मोठा साठा सापडला
ठार मारण्याच्या उदेशाने आरिफ चे अपहरण करण्यात आले व माझ्या जिवालाही धोका असल्याचे खरात याने तक्रारीत नमूद केले आहे. यावरून आरोपी हिमांशू झंवर, अमोल गवई व २ अनोळखी इसम( राहणार बुलढाणा) यांच्याविरुद्ध भादवीच्या कलम ३६३, ३६४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा… कुख्यात बुकी सोंटू जैन पळाला की त्याला पळवले? नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार बळीराम गीते, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. आज उत्तररात्री पर्यंत बोराखेडी पोलिसांनी ‘काँबिंग ऑपरेशन’ राबविले. याची कुणकुण लागताच आरोपींनी आरिफ याला जळगाव जिल्ह्यातील बोदवड जवळ मोबाईल हिसकावून सोडून दिले. त्याने आज शुक्रवारी सकाळी कसेबसे बोराखेडी ठाणे गाठले! त्याला मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले असले तरी तो सुखरूप बचावल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
वेगवान तपास करीत पोलिसांनी एका आरोपीस बुलढाण्यातून ताब्यात घेतले. अमोल गवई असे त्याचे नाव आहे. अनिल भुसारी, राजेश आगाशे, कपिश काशपाग, प्रवीण पडोळ, चालक खर्चे या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आणखी एकास पोलिसांनी ‘उचलल्याचे’ समजते. मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही