लोकसत्ता टीम

नागपूर: मध्य रेल्वेतील आठही वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ८४ टक्के पेक्षा अधिक प्रतिसाद आहे. एवढेच नव्हेतर कायम अल्पतिसाद असलेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला अचानक प्रतिसाद वाढला आहे. याचे नेमके कारण काय तर जाणून घेऊया.

वंदे भारत एक्सप्रेस आणि ज्या रेल्वेगाड्यांना एक्झुकेटीव्ह क्लास आणि चेअर कार आहे. त्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आसन रिकामे असल्यास प्रवास भाड्यात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु मध्य रेल्वेतून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अशी सवलत देण्याची वेळेच आलेली नाही.

हेही वाचा… सर्वधर्मसमभावाचे उदाहरण! ६५ वर्षीय महिलेची आषाढी वारी; मुस्लिम बांधवांकडून सत्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तीन-चार दिवसात मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला ९८.६७ टक्के आणि शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला १००.६२ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला १११.४३ टक्के आणि सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला ११२.४१ टक्के, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला १०७.७३ टक्के, बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस १२१.५० टक्के, मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस १०२.२६ टक्के, गोवा-मुंबई (सीएसएमटी) वंदे भारत एक्सप्रेसला ९२.०७ टक्के प्रतिसाद आहे.

हेही वाचा… धक्कादायक! नवीन मोबाइल घेऊन न दिल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर-बिलासपूरला अचानक प्रतिसाद वाढला आहे. या मार्गावर सरासरी ५५ टक्के प्रतिसाद होता. परंतु १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस आठ डबे केल्यानंतर ही गाडी भरून जात असल्याचे दिसून येत आहे.