Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी २०२४ हे लीप वर्ष आहे. कारण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतील. दर ४ वर्षांनी हा दिवस येतो. २०२४ हे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे आहे अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

म्हणजेच हे वर्ष ३६५ दिवसांऐवजी ३६६ दिवसांचे असेल. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला दरवर्षी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंद लागतात तसेच ४ वर्षानंतर ३६६ दिवस पूर्ण होतात. फेब्रुवारी महिन्यात हा अतिरिक्त दिवस जोडला जातो आणि त्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २८ ऐवजी २९ दिवस असतात. या अतिरिक्त दिवसाला ‘लीप वर्ष’ म्हणतात. २०२०, २०२४, २०२८ लीप वर्षे आहेत.

हेही वाचा – अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले? मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…

अतिरिक्त महिना आणि लीप वर्षात फरक आहे

लीप वर्ष हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणा तर अधिक मास चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा समधि आहेत. प्राचीन काळापासून भारतामध्ये चंद्र दिनदर्शिकेचा उपयोग केला जातो. आपली बहुतेक सण हे चंद्र दिनदर्शिका प्रमाणे होतात. चंद्र महिना २९.५ दिवसांचा असतो आणि वर्ष ३५४ दिवसांचे असते (३५४ दिवस, २२ घडी, १ पल आणि २३ विपल). म्हणजे सूर्य वर्षात ११ दिवस कमी पडतात. (१० दिवस, ५३ घडी, २१ पल) दर ३ वर्षांनी (३२ महिने, १६ दिवस आणि ८ तासांनी) अधिक महिना येतो. त्यात एक महिना जास्त असतो. या अतिरिक्त महिन्याला अधिक मास म्हणतात. सूर्य महिन्याचा समावेश करण्यासाठी, दर ३ वर्षांनी आणखी महिना जोडला जातो. १८ सप्टेंबर – १६ ऑक्टोबर २०२०, १८ जुलै – १६ ऑगस्ट २०२३, १७ मे – १५ जून २०२६ ही अधिक मासची वर्षे आहेत. अधिक मासात एक महिना वाढविला जातो आणि लीप वर्षांमध्ये, एक दिवस वाढविला जातो.

लीप सेकंद म्हणजे काय?

काही वर्ष अंतराने पृथ्वीच्या वेगात काही सेकंदांचा/मिली सेकंदाचा फरक पडतो, तो सेकंद समाविष्ट करण्यासाठी त्यात एक सेकंदाचा किंवा मिली सेकंदाचा बदल करावा लागतो. आपली पृथ्वी एका दिवसात २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंदात आपल्या अक्षावर फिरते. परंतु काही दिवसात वेग सेकंद/मिलिसेकंदांपेक्षा जास्त किंवा कमी असतो. हे सामावून घेण्यासाठी, सेकंद जोडले जातात, हे लीप सेकंद आहे.

हेही वाचा – मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या नवजात बाळाचा पुढील वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?

ज्या बालकांचा जन्म २९ फेब्रुवारीला होईल, त्याचा पुढचा वाढदिवस ४ वर्षांनीच येईल. त्यामुळे वाढदिवस आणि इतर समस्या येऊ शकतात, तर यावर उपाय असा की २९ फेब्रुवारीला जन्माला येणाऱ्या सर्व बालकांचा वाढदिवस १ मार्चलाच साजरा करावा! ही माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.