बुलढाणा : होणार… होणार… म्हणत आज, शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या. यामुळे खऱ्या अर्थाने महासंग्रामाचे पडघमदेखील वाजले. मात्र, मुहूर्त ठरला पण नवरदेवांचा पत्ता नाही, जागा कुणाला, असे मजेदार चित्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढतींच्या आजवरच्या इतिहासात दुहेरी लढतीच झाल्या आहे. मतविभाजन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, भारिप-बमसं, बसपासारख्या पक्षांनी काही लढतीत अनपेक्षित मतदान घेतले, मात्र ते विजयापासून कोसो दूरच राहिले. यंदाची लढतही परंपरा पाळणारीच ठरणार, असा सध्याचा रागरंग आहे. यामुळे मुख्य लढत महाआघाडी व महायुती अशीच राहील, अशीच चिन्हे आहे.

हेही वाचा…भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार कोण? चंद्रपुरात काँग्रेस पक्षात घोळ सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आचारसंहिता लागली अन् २६ एप्रिलचा मुहूर्त ठरला तरी महायुती व आघाडीचा उमेदवार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दोन्ही शिवसेना बुलढाणा आमचाच, असा दावा करीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे वृत्त असताना युतीतील तिहेरी तिढा कायमच आहे. आघाडीच्या मुंबईत तर युतीच्या दिल्लीतील बैठकानंतर तिकीट कुणाला? हे येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. तूर्तास, ‘मुहूर्त’ ठरला, पडघम वाजले मात्र ‘नवरदेव’ काही ठरेना, असे चित्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आहे.