नागपूर: विदर्भातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करून सर्जनशील अभिनयाचे दर्शन घडवले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ची नागपूर विभागाची प्राथमिक फेरी रविवारी सर्वोदय आश्रमात पार पडली. तर अमरावती विभागाची फेरी सोमवारी जेसीआयच्या सभागृहात झाली. नागपूर, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला येथील महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये एकांकिका सादर केल्या.

या स्पर्धेत सादर झालेल्या ‘द डील’, ‘पासपोर्ट’, ‘डेडलाईन’, ‘थेंब थेंब स्वाश’ आणि ‘स्वधर्म’ नाटकांनी रसिकांची मने जिंकली. उत्कट संगीत, भारदस्त संवाद आणि पुराणकाळ भासावा असे नेपथ्य यामुळे नाटकांनी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली. प्राथमिक फेरीतून पाच एकांकिका उत्कृष्ट ठरल्या. यानंतर विभागीय अंतिम फेरी १२ डिसेंबरला लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होणार आहे.

हेही वाचा – नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

कौतुकास्पद उपक्रम

‘लोकसत्ता लोकांकिका’ हा कौतुकास्पद उपक्रम आहे. या एकांकिकांमध्ये नवीन संहिता, नवीन चेहरे असतात ही जमेची बाजू आहे. रंगभूमीच्या उत्कर्षासाठी हे महत्त्वाचे आहे. राज्यभर होत असल्याने ही संपूर्ण महाराष्ट्राची स्पर्धा झाली आहे. भविष्यातील कलावंत घडवणारे व्यासपीठ लोकसत्ताने दिले त्यासाठी अभिनंदन. – अनिल पालकर, नाट्य कलावंत, (स्पर्धेचे परीक्षक)

वैविध्यपूर्ण एकांकिका

विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य होते. युवा पिढी चांगला विचार करते हे जाणवले. हे विद्यार्थी केवळ विचारच करत नाहीत तर विचारांची देवणघेवाण करतात. एकाहून एक सरस एकांकिका पाहताना मलाही खूप काही शिकता आले. नव्या पिढीसाठी नकाराचा सूर आळवला जात असताना या स्पर्धेतून आशेचा किरण दिसला. – मुकुंद वसुले, ज्येष्ठ नाट्यकलावंत

हेही वाचा – VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीत धडक

  • द डील- नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर.
  • डेडलाईन- श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती.
  • पासपोर्ट – वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर.
  • थेंब थेंब श्वास- ललित कला विभाग, रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर.
  • स्वधर्म- शिवाजी कला महाविद्यालय, अकोला.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू प्राधिकरण
सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक : झी टॉकिज, केसरी टूर्स
पॉवर्ड बाय : एन. एल. दालमिया
सहाय्य : अस्तित्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स