लोकसत्ता टीम

बुलढाणा: ९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा कृषी व महसूल यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानीचा अहवाल सादर केला. यानुसार ६ तालुक्याना अवकाळीचा फटका बसला आहे.

आणखी वाचा-विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दव्याने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक सर्वेक्षण नुसार ‘अवकाळी’चा १०२ गावांना फटका बसला असून तब्बल साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यामुळे मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय फळबागांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने आंब्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याशिवाय १४ गावांतील ३०९ घरांची आंशिक पडझड झाली आहे. वीज पडून व झाडाखाली दबून १३ जनावरे दगावली आहे. संग्रामपूर तालुक्यातील तिघेजण वीज पडून गंभीर जखमी झाले. राहुल छळकर, विशाल छळकर, मोहन डोंगरे अशी जखमींची नावे असून ते ट्रॅक्टर ने जात होते.