नागपूर : कुटुंबातील सदस्य आजारी असेल, त्याठिकाणी उपचार शक्य नसेल तर माणसे राज्याचीच काय, तर देशाची सीमा पार करायला सुद्धा मागेपुढे पाहात नाहीत. मात्र, पशुपक्ष्यांच्या बाबतीत असे काही होऊ शकते, याचा विचार कुणीही करू शकत नाही. मध्यप्रदेशातील एका तरुणाने मात्र हा समज खोटा ठरवला. हाताच्या मुठीत मावेल अशा एका छोट्याशा पक्ष्यावरील उपचारासाठी त्याने चक्क मध्यप्रदेशची सीमा ओलांडली आणि महाराष्ट्रात त्याला उपचारासाठी घेऊन आला.
भारतातील पहिले “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” नागपूर प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत सेमिनरी हिल्स येथे आहे. ये सेंटरची महती राज्यातच नव्हे तर देशात जाऊन पोहचली आहे. विदेशातील वन्यजीवप्रेमींनी देखील या सेंटरला भेट दिली आहे. तर याच सेंटरच्या धर्तीवर राज्यात आणि देशातही ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहेत. या सेंटरमधील जवळपास ८० टक्के पक्षी प्राणी दुरुस्त होऊन निसर्गात मुक्त करण्यात आले आहेत. या सेंटरची महत्त्व एकूणच मध्यप्रदेश मधील एक व्यक्ती एका छोट्याशा पक्षाला घेऊन येथे आला. प्राणी, पक्षी सर्व जिवसृष्टी यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे खूप आहेत, पण एक तरुण व त्याचे पक्षी प्रेम बघून भारावून सेंटरचे सगळेच भारावून गेले.
ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ला नागपुरातील बरेच लोक जखमी पक्षी आणून देतात, परंतु मध्य प्रदेशातील सौन्सर या गावातून कुलदीप बघेल या तरुणाने भौरी (Dove) छोटासा पक्षी उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ला आणला. त्याच्या म्हणण्यानुसार गाडीला धडक लागून त्याचे पंख जखमी झाले होते, त्यानी सौन्सर ला स्थानिक डॉक्टरांना दाखवले. दोन-तीन दिवस उपचार केला. परंतु उपचार बघून त्याचे समाधान झाले नाही, त्यानी गुगल वरून आपल्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ची माहिती काढली आणि लगेच सौन्सर मध्य प्रदेश वरून नागपूरला ट्रांझिट ला घेऊन आला.
ट्रांझिटच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले, त्या पक्षाचा एक पंख फ्रॅक्चर आहे. त्याला पिनिंग करून उपचार करण्यात आले. नंतर त्या कुलदीप नावाच्या युवकला ट्रान्झिट सेंटर दाखवले. इथले पेशंट व उपचार पद्धती बघून तो भारावून गेला, जातांना आत्मिक समाधानाने म्हणून गेला “मैं सही समय पंछी को सही जगह लाया” असे ही प्रेमी आहेत, म्हणूनच जिवसृष्टी आहे. या केंद्रात आजतागायत राज्यातून प्राणीपक्षी उपचारासाठी येत होते आणि आता राज्याची सीमा ओलांडून देखील लोक प्राणी, पक्ष्यांना उपचारासाठी आणत आहेत.