Maharashtra Assembly Winter Session 2022 Updates Today : नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र विरोधी पक्षांमधील ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या ठरावाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलं आहे. तसेच या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनातील घडामोडींसह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सविस्तर बातम्या वाचा एकाच क्लिकर वर