लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी येथील राजकीय पक्ष सर्वतोपरी पर्यत्न करीत आहेत. येथे १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ३९ जागांसाठी मतदान होणार आहे. पण, मतदानाच्या दोन आठवडे आधी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या नेत्यांनी मतदारांना रोख पैसे आणि भेटवस्तू वाटल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यातून आदर्श आचारसंहितेचं (MCC) उल्लंघन केल्याचा दावा केला जात आहे. पण, खरंच डीएमकेच्या नेत्यांनी अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग करून, मतदारांना रोख पैसे आणि भेटवस्तू वाटल्या का? या संदर्भातील सत्य माहिती जाणून घेऊ…

लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलेला एक व्हिडीओ आढळला; ज्यात द्रमुक नेते पैसेवाटप करून मतदारांना खरेदी करीत असल्याचा दावा व्हिडीओसह करण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा तपास करण्यास सुरुवात केली.

they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर SK Chakraborty याने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे.

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन पाहा.

https://web.archive.org/web/20240409083949/https://twitter.com/sanjoychakra/status/1775159048230305803

इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास:

आम्ही InVid क्रोम एक्स्टेंशनमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि व्हिडीओच्या अनेक कीफ्रेम्स मिळवून, आमची तपासणी सुरू केली. त्यानंतर आम्ही कीफ्रेम्सवर एक-एक करून रिव्हर्स इमेज सर्च केल्या.

कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करताना आम्हाला ३ जानेवारी २०२४ रोजीची फेसबुक पोस्ट आढळली.

त्यात वैलनकन्नी येथील डीएमकेचे केंद्रीय सचिव थॉमस अल्वा एडिसन दिसत आहेत. ही पोस्ट त्यांना टॅग करण्यात आली आहे.

फेसबुक कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला Facebook वर आणखी एक व्हिडीओ सापडला; जो आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अपलोड करण्यात आला होता.

त्यात #newyearparty हा हॅशटॅग वापरला होता. त्यानुसार हा व्हिडीओ नवीन वर्षाच्या पार्टीचा व्हिडीओ आहे. आम्हाला व्हायरल व्हिडीओच्या शेवटच्या फ्रेममध्ये एका इमारतीचे प्रवेशद्वार दिसले, ज्यावर हॅप्पी न्यू ईयर 2024” असे एक बॅनर होचे. ज्यावरुन हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यानचा असल्याचे दिसते.

आम्हाला डीएमके नेत्याच्या फेसबुक प्रोफाइलवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला आहे.

Notta AI वापरून आम्ही या व्हिडीओमधील ऑडिओ ट्रान्स्क्राइब केला आणि त्यातून काढलेला मजकूर अनुवादित केला.

डीएमके नेते थॉमस अल्वा एडिसन व्हिडीओमध्ये असे म्हणताना दिसले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि तो अलीकडील असल्याचा दावा करून प्रसारित केला जात आहे. त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नवीन वर्षानिमित्त आयोजित एका उपक्रमाचा हा व्हिडीओ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे दावे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही एडिसन यांनी केला.

निष्कर्ष :

DMK नेते थॉमस अल्वा एडिसन यांचा नवीन वर्षानिमित्त भेटवस्तूंचे वितरण करतानाचा जुना व्हिडीओ भ्रामक दाव्यांसह अलीकडील असल्याचे सांगून शेअर केला जात आहे.