वर्धा : दगडाला शेंदूर फासला तर तो पण निवडून येईल, असे सुगीचे दिवस गेल्याचे काँग्रेसला आता पटले आहे. वरून उमेदवार लादण्याचे किंवा अकोल्याचा नेता वर्धेत लढायला पाठवण्याची हिम्मत दाखविणारे श्रेष्ठी आता ताकही फुंकून पित आहेत. दोन व तीन जूनला प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभा निवडणूकपूर्व तयारी म्हणून बैठक बोलावली आहे.
हेही वाचा >>> नागपूर: सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशिष देशमुख म्हणतात, की मला पक्षातून काढण्याचे आधीच…
जिल्हानिहाय होणाऱ्या या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्धा तास देण्यात आला आहे. लोकसभा मतदार संघाबाबत आघाडी, संभाव्य उमेदवार, तेथील समीकरण, आदींबाबत कार्यकर्त्यांचीही मते जाणून घेण्यात येणार आहे. २०१९ चे लोकसभा, विधानसभा उमेदवार, विविध विभागाचे व सेलचे अध्यक्ष यांची मते प्रदेशाध्यक्ष पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, आरिफ नसीम खान, चंद्रकांत हांडोरे व अन्य नेते जाणून घेणार आहेत. यात सहभागी होणाऱ्यांची यादी सत्तावीस मे पर्यंत पाठवायची आहे. टिळक भवनात ही बैठक होत आहे.