प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे आज वर्धा दौऱ्यावर आहेत. अत्यंत गोपनीय असा वर्धा  दौरा सुरक्षा व्यवस्थेच्या धावपळीतून उजेडात आला.आष्टी येथे ते थेट पोहचले. संघ प्रचारक मंगेश जोशी यांच्या शेतात शिवलिंगाची स्थापना व पूजा आहे.तिथे भागवत यांनी हजेरी लावली.त्यानंतर ते आष्टी शहीद स्थळी हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत.

हेही वाचा >>> विदर्भातील शिंदे गटाच्या खासदारांच्या प्रश्नामुळे केंद्र सरकारचे पितळ उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथीलच संघ कार्यकर्ते देशपांडे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असल्याचे समजले.त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील संघ पदाधिकऱ्यांशी त्यांची बैठक होणार आहे.स्थानिक संघ पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर ते भागवत यांच्या दौऱ्या बाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तसेच प्रसार माध्यमांकडे याची नोंद अधिकृत घोषित दौरा नसल्याने झाली नाही.