बुलढाणा : चंदन तस्करीवर आधारित पुष्पा चित्रपट देशभरात गाजला. त्याचा दुसरा भाग देखील गाजला. हे आठवण्याचे कारण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातही काही ‘पुष्पा’ कार्यरत आहेत. अशाच एका कारवाईत पोलिसांनी चंदनाचा मोठा साठा जप्त केला आहे. यातील चंदन तस्कराने मूल्यवान चंदनाची तस्करी करण्यासाठी मोठी नामी शक्कल लढविली. मात्र चंदनाचा साठा पोलिसांच्या हाती लागलाच, मात्र आता या मागील पुष्पा कोण याचा तपास लावण्याचे आव्हान मलकापूर पोलिसासमोर उभे ठाकले आहे.

मलकापूर शहर पोलिसांनी आयशरद्वारे नेण्यात येणारे पंधरा लाख रुपये किमतीचे आठ क्विंटल चंदन जप्त केले आहे . या प्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. वाहनासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

छुपा कप्पा बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपानजीक मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर कडे जाणारे मालवाहू आशयर आले. संशयावरून पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. वाहनात वर करणी साधा माल ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांची खबर पक्की होती. यामुळे मलकापूर पोलिसांनी ‘सखोल’ तपासणी केली असता धक्कादायक बाब आढळून आली. टाटा आयशर गाडीमध्ये अतिरिक्त कप्पा बनवून चंदनाचा मोठा साठा दडवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.त्यात सहा क्विंटल २९ किलो दीड फुटांचे चंदन गाभे, दोन क्विंटल चंदन गाभा आणि चुरा असे आठ क्विंटल चंदन असा १५ लाख ३० हजार रुपये किमतीचा चंदन साठा जप्त करण्यात आला . मलकापूर पोलिसाकडून आयशर सह २५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक चौकशीत वाहनचालकाचे नाव शेख जैनुद्दीन शेख अजीम ( वय ४२ वर्षे असल्याचे आढळून आले. तो तालुका जिल्हा बीड नेकनूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहन चालक सध्या राज्यात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याने या चंदन तस्करीचे बीड कनेक्शन आहे का याचा तपास करण्यात येत आहे. तसेच खरा सूत्रधार कोण याचाही तपास लावण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. दरम्यान nचंदनाचा माल असल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.