प्रेयसी प्रियकराकडे वारंवार ‘आयफोन’ची मागणी करत होती. त्यामुळे प्रेयसीच्या मागणीला कंटाळलेल्या प्रियकराने तिचा चाकूने भोसकून खून केला. मुस्कान अशोक काचेवार (१९) रा. आमला, जि. बैतूल (म.प्र.) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर पुनित सुनील सोनी (२८) गणेश कॉलनी, आमला असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास चारगाव रस्त्यावरील विटा भट्टीजवळ एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तत्काळ खुनाचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार ओमप्रकाश कोकाटे यांनी विविध ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपवर मृत तरुणीचे छायाचित्र पाठवले.

रविवारी सकाळी एकाने काटोल पोलिसांना फोलिसांना फोन करून मृत तरुणी ही आमला येथील मुस्कान काचेवारसारखी दिसत असल्याचे सांगितले. पोलिसांनी मृत तरुणीच्या आईला तिचा फोटो दाखवला असता ती मुस्कान असल्याचे स्पष्ट झाले. मुस्कान ही आमला येथील क्रिष्णा ज्वेलर्स येथे काम करायची. पोलिसांनी दुकान मालक पुनित सुनील सोनी (२८) गणेश कॉलनी, आमला आणि दुकानातील विधी संघर्षग्रस्त नोकर यास ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. दोघांनीही मुस्कानचा खून केल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्कान करायची ब्लॅकमेल
एक वर्षापासून मुस्कान ही क्रृष्णा ज्वेलर्स येथे कामाला होती. दुकानमालक पुनित आणि मुस्कान यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा झाले. याच गोष्टीचा फायदा घेत मुस्कान पुनितला ‘ब्लॅकमेल’ करत होती. त्यामुळे पुनित त्रस्त झाला होता.