नागपूर : जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याचे पडसाद राज्यभर उमटल्यावर पेटलेल्या आंदोलनामुळे शनिवार ते सोमवारपर्यंत एसटीला तब्बल ५.२५ कोटींचा फटका बसला.

मराठा आंदोलनामुळे राज्यात बंदचा सर्वाधिक प्रभाव प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ आगार पूर्णत: बंद होते. या काळात आंदोलकांनी एसटीच्या २० बसेस जाळल्या. तर १९ बसेसची मोडतोड केली. त्यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले.

हेही वाचा – धक्कादायक! गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन संपविले जीवन

हेही वाचा – जरांगे पाटलांच्या मागणीने ओबीसींमध्ये धडकी? काय आहे ओबीसी संघटनांचे म्हणणे, वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंद असलेल्या आगारामुळे व इतर आगारांतील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे ८ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. तर सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत एसटीच्या राज्यातील एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे ६२०० फेऱ्या बंदमुळे रद्द झाल्या. त्यामुळे सोमवारी दिवसभर सुमारे एसटीचे सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांचा महसूलही बुडाल्याचा एसटी महामंडळाचा दावा आहे.