नागपूर : बेरोजगारी वरून केंद्र सरकारला अनेकदा टीका सहन करावी लागते. मात्र आता अनेक शासकीय बँकांमध्ये नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. देशातील महत्त्वाच्या बँकांमध्ये ५० हजारांवर जागांमध्ये भरती होणार असल्याने बँकेची तयारी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच पदवीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थीही या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करू शकतात. तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुमारे ५०,००० नव्या भरत्या करणार आहेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे बँकांमधील रिक्त पदं भरणं, डिजिटल बँकिंग सेवा बळकट करणं आणि ग्रामीण भागांमध्ये बँकिंग सेवा वाढवणे हा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका सामान्यतः आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) आणि एसबीआययांच्यामार्फत परीक्षा घेतात.

भारतीय स्टेट बँक मध्ये २० हजार जगावर भरती

बँकिंग क्षेत्रात मोठा प्रमाणात पदभरती होणार असून यात भारतीय स्टेट बँक बँकेमध्ये वीस हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी राहणार आहे. यामध्ये आतापर्यंत ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर आणि १३,४५५ ज्युनिअर असोसिएट्स यांची भरती पूर्ण झाली आहे. यासोबत पंजाब नॅशनल बँक ५,५०० पेक्षा जास्त पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४००० नवीन नियुक्त्या, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, केनरा बँक यामध्येही हजारोंच्या संख्येने भरती होणार आहे. हे सर्व बँकिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.