लोकसत्ता टीम

नागपूर : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या ११ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा घेत आहेत. ही सभा उत्तर नागपूरमधील बेझनबाग मैदानावर दुपारी ३ वाजता होणार आहे.

उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभर बसपा मतांची टक्केवारी घटत आहेत. बसपा समोर अस्तित्वाची प्रश्न निर्माण झाला असताना बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या भाच्याला पक्षाचा संभावित चेहरा म्हणून समोर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी मायावती नागपुरात येत आहेत.

आणखी वाचा-कोराडीत शिंदे-बावनकुळे भेट, राजकीय मुद्यावर चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सभेसाठी बसपाचे राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी खासदार राम गौतम, दुसरे प्रभारी नितीन सिंग तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲड. परमेश्वर गोणारे तसेच महाराष्ट्र राज्यातील बसपाचे सर्व लोकसभा उमेदवार प्रामुख्याने उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेशचे माध्यम प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.