वर्धा : शिक्षणाचे विविध पैलू असतात. त्यात विज्ञान, तांत्रिक, वैद्यकीय व तत्सम व्यावसायिक शाखा केवळ विषयाशी तर अन्य पारंपरिक शाखा मूल्य शिक्षणाशी पण जुळल्या असतात. आता यापैकी वैद्यकीय शिक्षणात नैतिक मूल्य शिक्षण पण अनिवार्य करण्यात आले आहे. या पण शाखेत हा विषय वाचनपुरता होता. आता तो प्रश्नपत्रिकेत राहणार. म्हणजे त्यावर गुण मिळणार.

राष्ट्रीय वैद्यक आयोग म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनने या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. २०२४ – २५ म्हणजे या वर्षाच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या मुलांना हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. सक्षमता आधारित वैद्यकीय शिक्षण आता अभ्यासक्रमचा भाग ठरणार. नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यवसायिकता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. हे मॉड्युल भविष्यातील डॉक्टरांमध्ये या आवश्यक गोष्टी विकसित करण्यावर भर देणार.

आणखी वाचा-नागपूरच्या प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला अत्याचाराचा निषेध करणारे बडगे

ते भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनिवार्य ठरणार आहे. त्याचे पालन प्रत्येक संस्थेस काटेकोरपणे करावे लागणार. त्यासाठी नव्या अभ्यासक्रमात काही बदल करण्यात आले आहे. योग्यतेवर आधारित वैद्यकीय शिक्षण हे भारतीय वैद्यक शाखेच्या नव्या पदवीधरांना लागू होणार. परिणामी प्राथमिक आरोग्य सेवा पुरवठादार म्हणून काम करण्यासाठी नवे डॉक्टर सज्ज असतील. आवश्यक ज्ञान, कौशल्ये, दृष्टी या माध्यमातून उपलब्ध होतील. या नव्या परिपाठत विद्यार्थी केवळ सैद्धांतिक संकल्पनाशी परिचित राहणार नाही तर ते त्यांना प्राप्त ज्ञानाचा वापर व्यावहारिक परिस्थितीत करू शकतील.हे डॉक्टर प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून वास्तविक जीवनातील परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम ठरतील, असा हा अभ्यासक्रम राहणार. त्यावरच अभ्यासक्रम लक्ष केंद्रित करणार.

आणखी वाचा-“भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे म्हणाले की नैतिक मूल्य पूर्वीपण वैद्यकीय शिक्षणाचा भाग होती. मात्र आता तो अभ्यास करीत गुण मिळविण्याचा भाग करण्यात आला आहे. पदवीच्या प्रत्येक विषयात नैतिक मुल्यावर एक प्रश्न राहणार. तो त्या विषयाशीच संबंधित असणार. मुलांना शवविच्छेदन शिकविल्या जाते. तर यात मृतदेह हाताळल्या जात असतो. म्हणून देह मृत असला तरी त्यास सन्मान देतच अध्ययन झाले पाहिजे, असे नवे वैद्यकीय मूल्य सांगणार. साध्यच नव्हे तर ते प्राप्त करण्याचे साधन पण महत्वाचे म्हणजेच साधनसुचिता यास महत्व दिले, अशी प्रतिक्रिया आहे.