‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या महाअंतिम फेरीत धडक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चालली होती..प्राण कानाशी येऊन थांबले होते..टाळयांचा अखंड गजर सुरूच होता..अखेर विजेत्यांच्या नावाची घोषणा झाली अन् आपल्या अमोघ वाणीने ‘मंदिरातला राम’ उलगडणाऱ्या मेधावी  जांबकर हिने  ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या विभागीय अंतिम फेरीचे मैदान मारले.

अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विनय पाटील आणि स्वाती मेश्राम यांनी ‘विराट प्रश्न’ वर प्रकाश टाकत लोकसंख्या वाढीसह देशासमोर आलेल्या विविध प्रश्नांना हात घातला. अनिरुद्ध तळेगावकर  आणि अनिकेत दुर्गे याने  ‘मंदिरातला राम’ या विषयाचा उलगडा करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

अंतिम फेरीचे परीक्षण पुण्याच्या एच.व्ही. देसाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश राऊत आणि वर्धा येथील नाटय़लेखक-कलावंत रंजना पाठक यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. धनश्री बोरीकर, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्भिड लेखणीच्या वृत्तपत्रातून अशा उच्च दर्जाच्या वक्तृ त्व स्पध्रेचे आयोजन के ले जाते ही विद्यार्थ्यांसाठी जमेची बाजू आहे. अशा व्यासपीठामधूनच देशाचे नेतृत्व उभे राहणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राथमिक फेरीचे परीक्षक  लेखिका सायली लाखे-पिदडी आणि प्राध्यापक डॉ. अमित झपाटे यांचा मान्यवरांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अंतिम फेरीच्या परीक्षकांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेविषयी काही सूचना केल्या.  रंजना पाठक यांनी विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा असा सल्ला दिला. स्पध्रेचे सूत्रसंचालन नितीन ईश्वरे यांनी केले.

विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी

गेल्या दोन वर्षांपासून मी या स्पध्रेत सहभागी होत आहे, पण यश मिळत नव्हते. लोक सत्ताने वाचनाची गोडी लावली आणि विषय उलगडत गेले. आज प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे मुंबई येथील स्पध्रेत मला  विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दडपण आहे, पण त्यासोबत मेहनतीची तयारीही असल्याचे विभागीय फेरीमध्ये प्रथम आलेल्या अमरावती येथील मेधावी जांबकर हिने सांगितले.

प्रथम — मेधावी जांबकर – प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमरावती

द्वितीय – विनय पाटील – कमला नेहरू कॉलेज, नागपूर

तृतीय- स्वाती मेश्राम – डॉ. आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर

उत्तेजनार्थ प्रथम -अनिकेत दुर्गे- एसआरएम समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर

उत्तेजनार्थ द्वितीय-अनिरुद्ध तळेगावकर- इन्स्टिटयमूट ऑफ सायन्स, नागपूर

कस लावणारी स्पर्धा

वक्तृ त्व स्पर्धेसाठी वाणी आणि शब्द या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शब्द पाठ क रू न स्पर्धा जिंक ता येत नाहीत. त्यासाठी चिंतन, मनन महत्त्वाचे असून त्यासह विद्यार्थ्यांना वाचनाची खूप आवश्यकता आहे, असे मत  परीक्षक डॉ. गणेश राऊत यांनी व्यक्त केले. वर्तमानातील ज्वलंत विषय स्पध्रेत असल्याने स्पर्धा क स लावणारी होती. क ला आणि सादरीक रणासोबतच दृष्टिक ोन देखील महत्त्वाचा असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

विचारांना चालना देणारी स्पर्धा

ही विचारांना चालना देणारी स्पर्धा आहे. आज मी केवळ उत्तेजणार्थ पुरस्कार मिळविला असला तरी मला येथून मोठे वैचारिक प्रबोधन मिळाले आहे. यानिमित्ताने अनेक विषयांचा अभ्यासही झाला. पुढील वर्षी आणखी तयारी करणार आहे, असे अनिरुद्ध तळेगावकर याने सांगितले.

कोण म्हणते तरुणाई भरकटली आहे?

ही वक्तृ त्व स्पर्धा अतिशय उच्च पातळीची होती. साधारणपणे अशा स्पर्धा अलीक डच्या कोळात दिसून येत नाहीत. अशा स्पर्धा त्यांना मिळाल्या तर उत्कृ ष्ट वक्ते  महाराष्ट्रात तयार होतील. आजचे तरुण हे भरकटलेले आहेत असा होणारा आरोप लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेने खोडून काढला आहे, असे परीक्षक   रंजना पाठक म्हणाल्या.

एक पायरी वर चढलो

यंदा मला दुसरे पारितोषिक  मिळाल्याने एक पायरी वर चढलो आहे. या गोष्टीचा खूप आनंद आहे. लोकसत्ताने ही संधी उपलब्ध करून देत आमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केल्याचे द्वितीय पुरस्कार विजेता विनय पाटील याने सांगितले.

प्रगल्भता वाढविणारी स्पर्धा

या स्पध्रेचा दर्जा अतिशय वेगळा आहे. या स्पध्रेने वैचारिक  प्रक ल्भता आणली. वाचन, चिंतन, मनन याची सवय लावली. वृत्तपत्रातील बातम्यांपेक्षाही संपादकीय वाचण्यावर माझा अधिक  भर असतो, असे मत चंद्रपूर येथील स्वाती मेश्राम हिने व्यक्त केले.

विचारांच्या कक्षा रुंदावल्या

नवीन पिढीच्या विचारांच्या क क्षा रुंदावल्या आहेत. त्यांची चिंतन क्षमता चांगली आहे. वक्तृ त्व महत्त्वाचे आहे आणि हे या स्पध्रेतून जाणवते. या स्पर्धामधून श्रवणवृत्ती वृद्धिंगत होते, पण दुर्दैवाने श्रोते अशा कोर्यक्र माक डे पाठ फि रवतात, अशी खंत यवतमाळ येथून स्पर्धक मुलीसोबत आलेल्या डॉ. स्वाती जोशी यांनी व्यक्त केली.

सुटी काढून स्पर्धेला आलो

आपल्या आजूबाजूला जे कोही चालू आहे, जी परिस्थिती आहे, त्याची जाण मुलांना आहे. वाचनातून, स्वानुभवातून ते व्यक्त  क रतात. या स्पध्रेतून विद्यार्थ्यांच्या क क्षा रुं दावलेल्या दिसून आल्या. त्यामुळे मी आज कार्यालयातून सुटी काढून केवळ लोकसत्ताची ही वक्तृत्व स्पर्धा ऐकायला आलो, असे हिंगणा येथील मयूर कातोरे यांनी सांगितले.

लोक सत्ताचे व्यासपीठ कोमी आले

तरु णांना हे व्यासपीठ मिळत आहे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. विचारांना योग्य दिशेने चालना देण्यासाठी लोक सत्ताचे व्यासपीठ कोमी आले आहे. अनेक वर्षांपासून स्पर्धामध्ये जातो आहे. पण लोकसत्ताच्या स्पध्रेत सहभागी होण्याचा आनंद काही औरच आहे, असे चंद्रपूर येथील अनिकेत दुर्गे याने सांगितले.

प्रायोजक : वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, अशा आठ केंद्रांवर होत आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड असून स्पर्धेचे बँकिंग पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीसर्च हे आहेत.

 

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medhavi jambkar enter in loksatta oratory competition mega final round zws
First published on: 08-03-2020 at 06:27 IST