राज्य शासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत स्थानिक आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यात हिरडा, आवळा, कडूलिंब, संत्री, डाळींब, पेरूसह इतरही वनस्पतींचा समावेश होता.
महाविद्यालय परिसरात अधीष्ठाता डॉ. गणेश मुकावार यांच्या हस्ते वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. मोहिमेत जास्तीत जास्त औषधीय वनस्पती लागवडींवर भर देण्यात आला. द्रव्यगुण विभागातर्फे गुंजा, एरंड, धोतरा, स्नही, जयपाल, कन्हेर तर रसायनशास्त्र विभागातर्फे काही रोपे लावण्यात आली. त्यात एकूण १३० वृक्षांचा समावेश होता. या मोहिमेत सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, पदवी, पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. माधुरी वाघ, डॉ. वर्षां गोगटे, सुधीर देशपांडे, डॉ. राजेंद्र लांबट, डॉ. गोस्वामी, डॉ. भड, डॉ. मोजेस, डॉ. गव्हाळ, डॉ. भिवगडे, डॉ. भटकर, डॉ. लखपती आदींनी परिश्रम घेतले. यापूर्वी जून महिन्यात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली होती व यात १०० औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.