अमरावती : रात्री आकाशात एखादी प्रकाशरेखा क्षणार्धात जाते. ती उल्का असते. अनेक उल्का रोजच पडत असतात. विशेषत: धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह आदी जेव्हा पृथ्वी कक्षेत येतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे या वस्तू वातावरणात घर्षणामुळे पेट घेऊन नजरेस पडतात. ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. येत्‍या १७ ते २० नोव्‍हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आकाशात चार दिवस हे मनोहारी दृश्‍य पहायला मिळणार आहे.

या उल्का वर्षावाला ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना एखाद्यावेळी क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते या घटनेस तारा तुटणे असे म्हणतात. ही एक खगोलीय घटना आहे. एखाद्यावेळी उल्का आपल्याला पडताना दिसते, या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. परंतू अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हे ही वाचा… Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. सर्व खगोलप्रेमींनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य पाहावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

उल्कावर्षावाची तीव्रता, निश्चित तारीख, वेळ या गोष्टी खात्री सांगता येत नाही. घराबाहेर आणि भराभर उल्का पडतांना दिसल्या, अशी अवास्तव कल्पना कोणी करु नये. उल्काचे निरीक्षण आणि त्याच्या नोंदीची खगोल जगतात खूप गरज आहे, असे खगोल अभ्‍यासकांचे म्‍हणणे आहे.
उल्कावर्षाव सहसा मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान सर्वात जास्त दृश्यमान असतो. शहरातील दिव्यांपासून दूर, गडद आकाशाखाली तारे पाहणे सोपे आहे. जेव्हा चंद्र सर्वात लहान होतो तेव्हा ढगविरहित रात्री देखील उल्कावर्षाव सर्वात तेजस्वी दिसतो.

हे ही वाचा… भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

काय आहे उल्कावर्षाव?

धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो, धुमकेतूने मागे टाकलेले ते अवशेष असतात. या उल्का एखाद्या तारका समुहातून येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्यापेक्षा जास्त उल्का आकाशातील एकाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरुप अवस्थेत पृथ्वीवर येतात, त्यास ‘अशनी’ म्हणतात, बाह्य अवकाशातील वस्तूचे नमूने या अशनीमुळे मिळतात.

Story img Loader