बुलढाणा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पीडितेच्या मैत्रीणीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे प्रशासकीय व पोलीस विभागाचे मुख्यालय असलेले बुलढाणा शहर हादरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडितेच्या आईने घटनेची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सूचनेवरून शहर पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवित तिघा आरोपींना जेरबंद केले. हशिर (अपूर्ण नाव, रा. बुलढाणा ) पूजा जाधव( रा. चिखली ) व दीपक गवई (रा. विजय नगर बुलढाणा ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध कलम ३७६, ,३७६ (२) (एन), ३४४, ३२३, ५०६, ३४ भादवी सह कलम ४, ५ (एल), ६, ८,१२ बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच कलम ३(१) (डब्ल्यू), ३(१)(आर), ३(२) (व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…

पीडिता १५ वर्षांची असून खामगाव मार्गावरील सुंदरखेड स्थित तार कॉलनी, येथील सत्यम शिवम अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या घरात १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान डांबून ठेवून तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र याची तक्रार २९ रोजी उशिरा देण्यात आली.

हेही वाचा…यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

घटनेच्या दिवशी १६ फेब्रुवारीला पीडिता सायंकाळी दूध आणण्यासाठी गेली होती. ती घरी आलीच नाही. अशिक्षित असल्याने मी तक्रार केली नसल्याचे आईने सांगितले. पीडिता २८ ला संध्याकाळी घरी आल्यानंतर तिने आईला तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. दूध आणण्यासाठी जात असताना चिखली मार्गावर गोलांडे लॉन जवळ आरोपी हशिर आणि पूजा जाधव हिने आवाज दिला. पूजाने घरी सोडण्याची बतावणी करीत पीडितेला घटनास्थळी नेले. आरोपी दीपक गवई याने १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे मुलीने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl sexually tortured in buldhana case registered against three including female friend scm 61 psg
First published on: 01-03-2024 at 19:01 IST