बुलढाणा : राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘यूतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? या प्रश्नावर त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वळून पाहत त्यांच्याकडे अंगुली निर्देश केला होता. फडणवीस यांनी उत्तर दिल्याने आता महायुतीचा भावी मुख्यमंत्री कोण हा प्रश्नच उद्भभवत नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी युती सरकार व त्यांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक (रिपोर्ट कार्ड) सादर केले. मलकापूर मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात आज शुक्रवारी, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या संवादाला प्रथमच भाजपचे (दुय्यम फळीतील) पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे आमदारांनी भाजप सोबत मिळते जुळते घेण्याचे प्रयत्न चालविल्याचे यावेळी दिसून आले. गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही कायमस्वरूपी किंबहुना दीर्घ कालीन योजना आहे.

हेही वाचा >>> चिखली मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ, काय आहे ‘नागपूर कनेक्शन’

विरोधक म्हणतात तसा तो विधानसभा निवडणूक फंडा नाही. मात्र, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या नेत्यांना गोरगरीब बहिन किंवा सर्वसामान्यांच्या वेदना काय कळणार?. एकीकडे विरोधक लाडकी बहीण विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन योजना बंद पाडण्याचे प्रयत्न करतात. दुसरीकडे आम्ही सत्तेत आलो तर दोन हजार रुपये देवू असे सांगतात असा हा विरोधाभास आहे. आज लाडक्या बहिणींना वर्षाचे अठरा हजार मिळत आहे. घरात दोन जणी पात्र असल्या तरी छत्तीस हजार रुपये मिळत आहे. घरातील शेतकरी असलेल्या बापाला आणि मुलाला वर्षाचे प्रत्येकी बारा हजार रुपये मिळत आहे. यामुळे गोरगरिबांना वर्षाकाठी हजारो रुपयांची मदत मिळत आहे. त्याचे मोल सामान्य जनतेला आहे. आघाडीच्या गर्भश्रीमंत नेत्यांना काही हजारांचे काय मोल असणार? असे गायकवाड म्हणाले. युती शासनाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळाली, कौशल्य विकास आणि योजनांदूत च्या माध्यमाने विद्यार्थ्यांना मानधन मिळत आहे. यामुळे युती सरकार हे आपले सरकार ही भावना सामान्य जनतेत रुजली आहे.ही बाब विरोधकांना खटकत आहे. राज्यात पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा >>> १५०० रुपयांच्या योजनेसाठी २०० कोटीचा जाहिरात खर्च, काँग्रेसचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेबांच्या वारसांनी…

महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला, आमच्या सरकारने जनकल्याण आणि चौफेर विकासाला प्राधान्य दिले. दोन सरकारमधील हा फरक आहे. स्वार्थासाठी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसांनी हिंदुत्ववादी विचारसरणीला जाहीर तिलांजली दिली, त्या ज्वलंत विचारांशी विश्वासघात केल्याचा गायकवाड यांनी यावेळी केला. युतीत जागा वाटपाचा कोणताही तिढा नसून आपण येत्या २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी युवा नेते मृत्युंजय गायकवाड, डॉक्टर राजेश्वर उबरहंडे, सुनील देशमुख, गजानन  धोंडगे, सोहम झालटे, मोहन पवार, सिद्धार्थ शर्मा, आशिष व्यवहारे, अनुजा सावळे उपस्थित होते.