हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, जर एखाद्या महिलेचा सन्मान होत नसेल. महिलांवर अन्याय होत असेल. महिलांशी असभ्य वागून त्यांची छेडखानी करणाऱ्यांना जाब विचाराने गुन्हा आहे का? असे प्रतिपादन आमदार संतोष बांगर यांनी केले.

हेही वाचा >>>VIDEO: नागपूर पोलिसांचा धीरेंद्र महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार, श्याम मानव म्हणाले, “आता…”

बांगर वाशीम येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिंगोली येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा ‘व्हिडीओ’ प्रसारित झाला होता. याप्रकरणी बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. बांगर यांनी सांगितले की, हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील काही महिला कर्मचारी माझ्याकडे आले असता त्यांनी तेथील प्राचार्य व उपप्राचार्य महिलांना त्रास देत असल्याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी महिलांना भेटलो असता त्यांनी सांगितले की, तेथील प्राचार्य आम्हाला वारंवार कार्यालयात बोलावून तासनतास बसून ठेवतात. तुम्ही साडी ऐवजी ड्रेस घालावा, सेक्सबद्दल बोलतात, तुम्ही खूप छान दिसता, अशा प्रकारे लज्जास्पद वागणूक देतात. याबाबत प्राचार्य आणि उपप्राचार्य यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मी कडवट शिवसैनिक आहे आणि आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की, महिलेवर कुणी अन्याय करत असेल तर त्याविरोधात लढा देण्याचे काम शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मी करीत असतो.

हेही वाचा >>>अकोला: बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणतो, ‘मला तर देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. या प्रकरणात अद्यापही त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई का करण्यात आली नाही, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. तसेच यावेळी आमदार बांगर यांनी त्या महिलांचे संभाषणच जाहीर केले. माझ्या मारहाणीचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाल्यानंतर या घटनेतील सत्य परिस्थिती काय आहे. त्या महिलेचे संभाषण मी मुख्यमंत्र्यांना दाखवले असता, त्यांनी माझी पाठ थोपटली असेही बांगर म्हणाले.