प्रवाशांनी गजबजलेल्या बुलढाणा बसस्थानकात आज दुपारी अचानक कमांडो आणि श्वान पथक दाखल झाले. त्यांनी तडकाफडकी कारवाई करीत तीन अतिरेक्यांना जेरबंद केले. यामुळे भयभीत प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. मात्र, सत्य समोर येताच उपस्थितांसह प्रवाशांचे चेहरे खुलले अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.

हेही वाचा- “४० गेले, १४० आणण्याची मनगटात ताकद, शिवसेना संपली असे कुणी समजू नये”; विरोधी पक्षनेते दानवेंचा हल्लाबोल

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

अतिरेकी हल्ला आणि हास्य हे वाचून कुणीही बुचकाळ्यात पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे कारणही तसेच मजेदार आहे. अतिरेकी हल्ला झालाच तर पोलीस दल कितपत तयार आहे, याची चाचपणी करण्यासाठी ‘मॉक ड्रिल’ अर्थात रंगीत तालीम करण्याचे निर्देश सर्व पोलीस आयुक्तालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व बुलढाणा शहराचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज, सोमवारी ही तालीम पार पडली.

हेही वाचा- नागपूर: भारत जोडो यात्रेचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीत दिसेल; काँग्रेसचे वरिष्ठ नेते पल्लम राजू यांचा विश्वास

ही तालीम हजारो प्रवाशांसाठी आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली. बुलढाणा बसस्थानकातून सुटणाऱ्या बहुतेक बसमध्ये यावरच चर्चा रंगली होती. अनेकांनी ही कारवाई आपल्या मोबाईलमध्ये टिपली.