नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रात भाजपचे सरकार येईपर्यंत आपल्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवत नव्हता असा आरोप अनेकदा केला जातो. मात्र, संघाकडून यावर कधीही उघड उत्तर दिले जात नव्हते. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने  संघाच्या कार्यालयात १९५० ते २००२ पर्यंत तिरंगा का फडकवला गेला नाही? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला असता,सरसंघचालकांनी  प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला. उलट काँग्रेसनेच तिरंग्याचा कसा अपमान केला हेही  सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर: स्टलॅलिनबाबत भूमिका स्पष्ट करा अन्यथा … विहिंपचा उद्धव ठाकरेंना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भागवत म्हणाले,संघाच्या दोन्ही मुख्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो. तसेच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही कुठेही असलो तरी तिथे तिरंगा ध्वज फडकवतो. त्यामुळे आम्ही तिरंगा फडकवतो की नाही हा प्रश्नच विचारायला नको असेही डॉ. भागवत म्हणाले. काँग्रेसचा झेंडा आणि तिरंगा ध्वजाचे रंग सारखे आहेत. १९३३च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लावलेला झेंडा फडकत नव्हता. तेव्हा एक तरुण समोर आला व रुळावर चढून त्याने दोरीने ओढत तो फडकवला होता. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्याची पाठ थोपटून पुढच्या अधिवेशनात सत्कार करण्याचे कबूल केले. मात्र, तो संघाच्या शाखेत जातो हे कळल्यावर त्यांनी तेही केले नाही. शेवटी डॉ. हेडगेवार त्यांना भेटले व तांब्याचा शिक्का देऊन सन्मान केला. सात वर्षांआधी त्या तरुणाचे निधन झाले. त्यामुळे तिरंग्याच्या सन्मानाचा प्रश्न जेव्हाही येतो तेव्हा संघाचा प्रत्येक स्वयंसेवक पुढे असतो असेही सरसंघचालक म्हणाले.