नागपूर : तळकोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच राज्य व्यापणार असल्याची नांदी भारतीय हवामान खात्याने दिली. विदर्भातही तो लवकरच येणार, पण यंदा त्याने मार्ग बदलला. विदर्भातील प्रवेशासाठी त्याने वाघांचा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याची निवड केली आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या आगमनात अडसर ठरणारे “बिपरजॉय” चक्रीवादळदेखील पुढे सरकले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत उद्यापासूनच पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काही काळासाठी मंदावला. तर दुसरीकडे पूर्वेकडील वाऱ्यांची गती नियमित असल्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात प्रवेश करणार आहे.

हेही वाचा – नागपूरहून गोव्याला जाणारी रेल्वे आता सप्टेंबरपर्यंत धावणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ जूनपासून कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर २४-२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.