scorecardresearch

नागपूर : कचऱ्याच्या डब्यांचाच ‘कचरा’ !

महापालिकेने विविध भागात १२०० च्या जवळपास शहरातील विविध भागात कचऱ्याचे डब्बे लावले होते. मात्र, त्यातील ६० टक्के डबे गायब झाले आहे.

wet and dry waste garbage bins
नागपूरमध्ये कचऱ्याच्या डब्यांचाच ‘कचरा’ (संग्रहित छायाचित्र)

नागपूर महापालिका प्रशासनाकडून ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी लावण्यात आलेले कचऱ्याचे ५०० पेक्षा अधिक डबे तुटले तर काही गायब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने महापालिका प्रशासनाकडून लोखंडी नाही तर स्टीलचे डबे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासंबंधी निविदा काढण्यात आली आहे.

हेही वाचा- नागपूर : तिप्पट नफ्याचे आमिष, गुंतवणुकीच्या नावावर ६५ लाखांनी फसवणूक

स्वच्छ व सुंदर नागपूर अंतर्गत शहरातील विविध बाजारपेठ आणि इतरही भागात महापालिकेच्यावतीने ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी लोखंडी डबे लावण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षात यातील बहुतांश डबे गायब झाले तर काही तुटलेल्या स्थितीत असल्यामुळे कचरा डब्यात नाही तर रस्त्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे शहरात ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी रस्त्यांवर नव्याने स्टीलचे डबे बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी ५०० डबे खरेदी केले जाणार असून ते काही विशिष्ट भागात लावले जाणार आहे.

हेही वाचा- मोठी पर्यावरण हानी झालेल्या ५० विभागांत महाराष्ट्र; ; भारतातील नऊ राज्यांचा समावेश

यापूर्वी महापालिकेने विविध भागात १२०० च्या जवळपास शहरातील विविध भागात कचऱ्याचे डब्बे लावले होते. मात्र, त्यातील ६० टक्के डबे गायब झाले आहे. बाजार, बसथांबे, रस्ते, फुटपाथवर असलेला ओला आणि सुका कचरा संकलनासाठी लोखंडी डबे बसवले होते. मात्र, अनेकदा डबे भरून जात असताना रस्त्यावर कचरा येत होता. चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांमधून निघत असलेला कचरा व इतर गोष्टी टाकण्यासाठी या डब्यांचा वापर सुरू झाला. ‘जी-२०’ च्या निमित्ताने स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवले जात असताना आता लोखंडी ऐवजी स्टीलचे डबे खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढली जात आहे.

रस्त्यावर ज्या ठिकाणी जास्त वर्दळ असते, अशा ठिकाणी हे डबे प्राधान्याने बसवण्यात येणार आहेत. रात्री उशिरा होणाऱ्या झाडलोटीमुळे रस्ते चकाचक होतात. मात्र दिवसभरात अनेकजण डबे नसल्यामुळे पुन्हा रस्त्यावर कचरा टाकतात. रस्त्यालगत कचराकुंडी नसल्यामुळे कचरा टाकण्यासाठी हा पर्याय काढण्यात आला असल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच तुटलेल्या डब्याच्या जागी आता लोखंडी डबे ऐवजी स्टीलचे डबे लागणार आहे. मात्र, जुन्या तुटलेल्या डब्याचे काय करणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- बुलढाणा: शेतकऱ्यांवरील लाठीमार षडयंत्रच ! मला संपविण्याची सुपारी देण्यात आली; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप

शहरातील विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी लोखंडी डबे लावण्यात आले होते. मात्र, अनेक भागातील डबे तुटल्यामुळे त्याजागी स्टीलचे नवे दोन डबे खरेदी करून ते लावले जाणार आहे, अशी माहिती नागपूर महापालिकेचे घनकचरा विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 09:35 IST

संबंधित बातम्या