अमरावती : आजवर उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांना पाठिंबा असल्‍याची बाब समोर आली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्‍हाण सेंटरमध्‍ये आयोजित शरद पवार गटाच्‍या बैठकीला उपस्थित राहून देवेंद्र भुयार यांनी हे स्‍पष्‍ट केले आहे.

स्‍वाभिमानी पक्षाच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या देवेंद्र भुयार यांची पक्षशिस्‍तीचे उल्‍लंघन केल्‍याचा ठपका ठेवून स्‍वाभिमानी पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली होती. राज्‍यात गेल्‍या वर्षी झालेल्‍या सत्‍तांतराच्‍या वेळी देवेंद्र भुयार हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्‍यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा न देता आपण अजित पवार यांचे समर्थक आहोत, असे सांगितले होते.

हेही वाचा… वर्धा: बोर पर्यटनास मिळणार चालना, जुना व नवा बोर प्रकल्पाचे एकत्रीकरण

हेही वाचा… नागपूर: उपराजधानीच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा खेळखंडोबा, ७८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्‍यानंतर देवेंद्र भुयार यांनी तत्‍काळ आपली भूमिका जाहीर केली नव्‍हती. आपण कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्‍यांनी सांगितले होते. दरम्‍यान, आज मुंबईत शरद पवार गटाच्‍या बैठकीला उपस्थित राहून त्‍यांनी आपले समर्थन दर्शवले आहे. देवेंद्र भुयार हे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांना आपले गुरू मानतात. त्‍यांचेही मार्गदर्शन देवेंद्र भुयार यांनी घेतल्‍याचे सांगितले जात आहे. मोर्शी मतदार संघातील राजकीय परिस्थिती पाहून त्‍यांनी ही भूमिका घेतल्‍याचे बोलले जात आहे.