वर्धा : सर्वच मतदारसंघात आता शेवटच्या सभा होत आहे. ही सभा झालेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठीच उमेदवार उपयोगात आणत असल्याचे दिसून येते. आर्वीत खासदार अमर काळे यांनी पत्नी मयुरा काळे यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री सभा घेत झालेल्या आरोपाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याच सभेत सर्व काही ते बोलून टाकू, असे त्यांनी पूर्वीच स्पष्ट करून टाकले होते.

ते म्हणाले की माझ्यावर विरोधकांनी एकच आरोप केला. घराणेशाहीचा. आत्ताच तर हा खासदार झाला, अन याले बायकोले आमदार करायची काय घाई झाली होती. सामान्य नव्हे तर तुमच्या जागी मी असतो तर मीही हाच विचार केला असता. पण मला सांगा देशात, राज्यात कुठे घराणेशाही नाही. मुख्यमंत्री शिंदे, नारायण राणे, अरुण अडसड, आशिष शेलार, एव्हडेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांचेही वडील दिवंगत आदरणीय गंगाधरराव फडणवीस पण आमदार होते. फडणवीस यांना एक व मला दुसरा न्याय कसां. मग मायाच बायकोने कोणतं घोडं मारलं.मयुरा काळे यांनी पक्षाकडे तिकीट मागितली नव्हती. साधा अर्ज केला नव्हता. शरद पवार यांनी आदेश दिला. यावेळी आर्वीत कशी लढाई होणार ते माहित आहे. म्हणून सक्षम उमेदवार मयुराच ठरू शकते. तीच लढणार, असे पवार यांनी स्पष्ट केल्यानेच मयुरा काळेची उमेदवारी आली.निर्णय होईल.

हेही वाचा…”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य

सुमितदादा यांचा नवे नेतृत्व म्हणून उल्लेख होत आहे. ते साधे सरळ समजत होतो. पण त्यांचे प्रचार पॉम्पलेट पाहले तेव्हा ते किती फोकनाड आहे हे कळले. त्यात विकासकामे सांगितली. त्यातील अनेक कामे मीच मंजूर केली आहे. अमर काळेचे सुमित वानखेडेला जाहिर आव्हान आहे. तुमच्या उद्याच्या ( सोमवार ) सभेत तुम्ही फेकालच. आर्वीचे हॉस्पिटल कोणी आणले, ते शपथवर सांगा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. फडणवीस प्रथम मुख्यमंत्री व नंतर उपमुख्यमंत्री असतांना वानखेडे पी ए होते. पण एकतरी काम मार्गी लावले का. तसे केले असते तर मी फॉर्मच भरला नसता. याचे उत्तर त्यांनी सभेत द्यावे. उद्धव ठाकरे यांची सहज कर्जमाफी हवी की देवेंद्र फडणवीस यांची खेटे घ्यायला लावणारी कर्जमाफी हवी, हे ठरवा. फडणवीस सांगत की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव. आता तीन हजार भाव आहे, असे काळे यांनी फडणवीस यांचा व्हिडिओ लावून स्पष्ट केले.

हेही वाचा…प्रियंका गांधींना फक्त बघता यावे यासाठी तब्बल चार तासाची प्रतीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडली बहिण योजना आणली. आपलाच खिसा कापून त्याचे पैसे देत आहे. हे फसवणूकचे सरकार आहे. अपेक्षित भाषण करू शकलो नाही. पण फडणवीस उद्याच्या सभेत बोलतील की फडणवीस म्हणजेच वानखेडे. पण गुरूच एव्हडा भारी तर चेला किती भारी, हे समजून घ्या. इतक्या वर्षांपासून राजकारण करतो. पण असा प्रचार पाहला नाही. असा मीही फिरलो नाही, दादाराव पण फिरले नाही. पण आमची नाळ ईथे जुळली आहे. ३० वर्षात कोणताच आरोप आमच्यावर झाला नाही, असे काळे यांनी नमूद केले. मयुरा काळे समर्थ नेतृत्व करतील. त्यांना संधी द्या. परिवारावर विश्वास टाका. गत आठ वर्षात काय केले याचे उत्तर सभेत द्या, असे आव्हान काळे यांनी शेवटी वानखेडे यांना केले.