लोकसत्ता टीम

वर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी आठवण निवडणूक काळात हमखास होत असल्याचे नवे नाही. दिल्लीचे आपचे खासदार संजयसिंग हे वर्धा दौऱ्यावर आज आले तेव्हा त्यांनीही शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला.

ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी दिलेली एक शिकवण महाराष्ट्रातील जनतेस नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गद्दारोको माफी नाही’, हा शिवाजी महाराजांचा संदेश आहे. घड्याळ चोरणाऱ्या, धनुष्यबाण चोरणाऱ्या गद्दारांना माफ करू नका. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन संजयसिंग यांनी केले. भाजपला निरोप देण्याची वेळ आली आहे. ते भुलथापा देणारी नारेबाजी करतात. त्याकडे दुर्लक्ष करा. मोदी की गॅरंटी म्हणतात ती गॅरंटी म्हणजे खोटे बोलण्याची गॅरंटी होय. बदल केला नाही तर ही निवडणूक कदाचित देशाची शेवटची निवडणूक ठरणार. संविधान बदलणार, आरक्षण संपणार, रोजगार राहणार नाही. हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होणार. म्हणून या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.

आणखी वाचा-तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्ध्यातून आघाडीने अमर काळे हा चांगला उमेदवार दिला आहे त्यास विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच इव्हीएम मतदानबाबत शंका व्यक्त करणारी विविध उदाहरणे पुढे आली आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. पण व्हीव्हीपॅट मधून निघणाऱ्या चिठ्यांची मोजदाद योग्य प्रकारे व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे जिल्हा निमंत्रक अविनाश काकडे, डॉ. शिरीष गोडे, आपचे मंगेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.